नायक आणि खलनायक यांचा काल्पनिक संघर्ष हा पडदयावर नेहमीच पाहायला मिळतो. पडद्यावरील जीवन आणि प्रत्यक्ष जीवन ह्याची प्रचंड तफावत देखील दिसून येते. म्हणूनच तर काय कलावंत हा पुष्कळ वेळा कलेत हरवून गेलेला पुतळाच असतो.त्याची पडद्यावरची असलेली मनोभूमिका ही प्रत्यक्ष पडदयावरमात्र पुर्णतः वेगळी असते. ती तशी असणे ह्यात काही नवल नाही कारण व्यावसायिक भूमिकेत शिरलेल्या कलेकडून वेगळे काही अपेक्षित नाही.
खलनायक वास्तविक जीवनपटावर नायक ठरताना दिसतो तर आभासी नायकाचे रूपांतर खऱ्याखुऱ्या पडद्यावर मात्र खलनायकी होतांना दिसते. मागील काही घडामोडी वर लक्ष दिले तर हे सहज लक्षात येईल. आमचे सुप्रसिद्ध पडद्यावरील सुपरस्टार नायक नुकतेच कारागृहाची कडवट हवा खात बाहेर पडले आहेत, तर काही अजूनही कोर्टाच्या चकरा मारीत आहेत आणि बरेच (खल)नायक कोर्टाची पायरी चढण्यास तयार आहेत. 
याउलट, पडद्यावरील खलनायक जे खऱ्या अर्थाने वयक्तिक जीवनात सामाजिक भान असलेले आहेत ते मात्र खलनायकी भूमिकेमुळे मालिन झालेले भासतात. काही असतीलही ! पण कित्येक आपल्या वयक्तिक जीवनात तसेच सामाजिक जीवनाचे भान जपत मार्गस्थ झालेले दिसतात किंवा आहेत.
आम्ही मात्र वास्तविक नायकांना विसरून पडद्यावरील नायकांना प्रेरणास्रोत करून ठेवलंय आणि म्हणूनच कदाचित अम्हीदेखील वास्तविक जीवनात खलनायक ठरत आहोत. आमचे राष्ट्रप्रेम, देशप्रेम, पितृप्रेम, मातृप्रेम इत्यादी देखील हे पडद्यावरील नायकांप्रमाणे असते म्हणूनच तर आमचे जीवन सुध्दा त्याच्या प्रमाणे प्रभावित व्हायला लागले आहे. असे कितीतरी उदाहरण सांगता येतील किंवा ते तुम्ही देखील बघत असाल ! आमचे देशप्रेम हे फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी ला तत्सम सेल्फी आणि social media वर DP ठेवण्यापूरते मर्यादित राहिले आहे. हे एक गंभीर वास्तव्य आहे ज्यावर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
वास्तविक ‘नायक’ मात्र ह्या सगळ्याच्या पलीकडे असतो आणि म्हणूनच तर तो नायक गणल्या जातो.
आम्ही मात्र नायक कधीच ठरू शकणार नाही; कारण आमचे प्रेरणास्रोत च खलनायकी ! आम्ही त्या गोष्टीतल्या गाढवाप्रमाणे दांभिक आहोत ज्याने वाघाची कातळी घालून डरकाळी फोडण्याच्या प्रयत्न केला होता. पण शेवटी गाढवच, सत्य समोर येणारच. आम्ही काय वेगळे आहोत ?? फरक इतकाच की ते चार पायाचे मन-बुद्धी नसलेले गाढव आणि आम्ही दोन पायाचे मन-बुद्धी असलेले दांभिक गाढव !

©Ganesh More

ganesh.rkmore@gmail.com

19 thoughts on “नायकांच्या कातडीतील खलनायक !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s